यूपीत 100 जागा लढवणार; युती कुणाशी ते योग्यवेळी सांगेन: ओवैसी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asaduddin Owaisi

यूपीत 100 जागा लढवणार; युती कुणाशी ते योग्यवेळी सांगेन: ओवैसी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लखनौ: पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत `एमआयएम` (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen - AIMIM) १०० जागा लढविणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आज केली. सध्या ओवेसी लखनौच्या दौऱ्यावर आहेत. तेथे ते म्हणाले, ‘‘पुढील विधानसभा निवडणुकीत १०० जागा लढविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तसेच एक-दोन पक्षांबरोबर युतीसाठी चर्चा सुरू आहे. युती होईल की नाही हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. परंतु, निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळेल.’’

हेही वाचा: देशात सध्यातरी बुस्टर डोसची आवश्यक नाही - ICMR

ओम प्रकाश राजभर यांनी आधी ओवेसी यांच्या पक्षाबरोबर युती करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, नंतर त्यांनी समाजवादी पक्षाबरोबर युतीची घोषणा केली. त्यामुळे आता इतर पक्षांशी चर्चा ओवेसी यांनी सुरू केली आहे. ओवेसी यांनी आधीही समाजवादी पक्षाबरोबर युती करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यासाठी फारशी उत्सुकता दाखविलेली नाही. ओवेसी यांनी आता १०० जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असल्याने त्याचा फटका समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसला बसू शकतो. कारण एमआयएम हे जेवढ्या जास्त जागा लढवेल त्याचा परिणाम मुस्लिम मतांवर पडेल.

हेही वाचा: मोदी अन् योगी...डबल इंजिनचे सरकार, संबित पात्रांची प्रतिक्रिया

प्रगतीशील समाजवादी पार्टीचे प्रमुख शिवपाल यादव यांच्याशी सध्या चर्चा सुरु असून त्यांनी आझाद समाज पार्टीच्या चंद्रशेखर आझाद यांच्याशी देखील बोलणं सुरु असल्याचं म्हटलंय. एमआयएम पक्षाचे उमेदवार हे फक्त मुस्लिम समाजातीलच नव्हे तर सगळ्या समाजातील असतील, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

गेल्यावेळी दारुण पराभव

403 जागांवर होणारी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. 2017 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला एकहाती विजय प्राप्त झाला होता. असदुद्दीन ओवेसी गेल्या काही महिन्यांपासून वारंवार उत्तर प्रदेशाचे दौरे करत आहेत. काही सभाही घेतल्या आहेत. गेल्या, २०१७ मधील यूपी विधानसभा निवडणुकीत ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने ३८ जागा लढविल्या होत्या. मात्र त्यापैकी ३७ जागांवर त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. यासर्व जागा प्रामुख्याने मुस्लिम बहुल असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशातील होत्या. त्यावेळी मतदारांनी त्यांच्या पक्षाला नाकारले होते. या निवडणुकीत 312 जागांवर विजय प्राप्त करुन भाजपला एकूण मतांपैकी 39.67 टक्के मते मिळाली होती. एमआयएम पक्षाने 38 जागांवर निवडणूक लढवली होती, ज्यामध्ये त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती. तर समाजवादी पार्टीला 47, बहुजन समाज पार्टीला 19 आणि काँग्रेसला सात जागा जिंकता आल्या होत्या.

loading image
go to top