तिरुपतीला केसांच्या विक्रीतून 2 कोटी 38 लाखांचे उत्पन्न

वृत्तसंस्था
शनिवार, 3 मार्च 2018

सर्वसाधारणपणे लांबीनुसार केसांची विभागणी करण्यात येते. पहिल्या श्रेणीमध्ये 31 इंच आणि त्यापेक्षा अधिक लांबीची, दुसऱ्या श्रेणीमध्ये सोळा ते तीस इंच, तिसऱ्या श्रेणीत दहा ते पंधरा इंच, चौथ्यात पाच ते नऊ इंच आणि पाचव्या श्रेणीमध्ये पाच इंचांपेक्षाही कमी लांबीच्या केसांचा समावेश होतो

तिरुपती/ हैदराबाद - तिरुपती देवस्थान समितीने भाविकांनी अर्पण केलेल्या केसांतून दरमहा 2 कोटी 38 हजार रुपये एवढी कमाई केल्याचे स्पष्ट झाले आहे. भाविकांच्या या केसांचा देवस्थान समितीकडून ई- लिलाव करण्यात आला होता.

दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी भाविकांच्या केसांचा लिलाव करण्यात येतो. या लिलावावेळी देवस्थान समितीचे अनेक ज्येष्ठ अधिकारी उपस्थित असतात. विविध प्रकारच्या पाच श्रेणींमध्ये विभागण्यात आलेले साडेतीन हजार किलोग्रॅम एवढ्या केसांचा ऑनलाइन लिलाव करण्यात आला. सर्वसाधारणपणे लांबीनुसार केसांची विभागणी करण्यात येते. पहिल्या श्रेणीमध्ये 31 इंच आणि त्यापेक्षा अधिक लांबीची, दुसऱ्या श्रेणीमध्ये सोळा ते तीस इंच, तिसऱ्या श्रेणीत दहा ते पंधरा इंच, चौथ्यात पाच ते नऊ इंच आणि पाचव्या श्रेणीमध्ये पाच इंचांपेक्षाही कमी लांबीच्या केसांचा समावेश होतो. पहिल्या श्रेणीतील पाचशे किलोग्रॅम एवढ्या वजनाचे केस विकून देवस्थान समितीने एक कोटी बारा लाख रुपये कमावले आहेत.

Web Title: tirupathi temple hair donation selling

टॅग्स