Tirupati Laddu Ghee Test Report : तिरुपती लाडूतील तुपाच्या नमुन्यांत प्राणिसदृश चरबी? आंध्रच्या मंत्र्यांकडून अहवालाचा संदर्भ, भाविकांच्या भावनांशी खेळ

Tirumala Temple Laddu Ghee : तिरुमला तिरुपती देवस्थानच्या लाडूंवर गंभीर आरोप झाले आहेत. तुपाच्या नमुन्यांत प्राणिसदृश चरबी असल्याचा अहवाल असल्याचे आंध्र मंत्र्यांचे म्हणणे असून या प्रकरणामुळे भाविकांमध्ये संताप आहे.
Tirumala temple Laddu ghee quality issue

Tirumala temple Laddu ghee quality issue

esakal

Updated on

Tirupati Balaji Laddu : तिरुमला तिरुपती देवस्थानकडून लाडूसाठी वापरण्यात येणाऱ्या तुपाच्या नमुन्यांमध्ये प्राणिसदृश चरबी असण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या (एनडीडीबी) अहवालात नमूद केल्याचा दावा आंध्र प्रदेशचे अर्थमंत्री पय्यावुला केशव यांनी केला. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी याच अहवालाचा उल्लेख केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक असलेल्या तिरुमाला तिरुपती देवस्थानमध्ये बनवलेल्या लाडूत भेसळयुक्त तूप वापरले गेल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com