Devotee Donates 121 Kg Gold to Tirupati Balaji Temple | Worth Rs 140 Crore : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यापैकी अनेकजण त्यांच्या श्रद्धेनुसार मंदिरात दान देतात. यामध्ये उद्योगपतींपासून ते सामान्य भक्तांपर्यंत सर्वांचा समावेश असतो. अशातच एका भाविकाने मंगळावारी तिरुपती बालाजीच्या चरणी तब्बल १२१ किलो सोनं दान केलं आहे. या सोन्याची किंमत जवळपास १४० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी याबाबत माहिती दिली.