VIDEO : भजनात सगळे तल्लीन होते अन् हनुमानाच्या वेशातला कलाकार स्टेजवर कोसळला, पुढं काय झालं पहा

गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात नाचत असताना एका कलाकाराचा मृत्यू झालाय.
Uttar Pradesh Mainpuri
Uttar Pradesh Mainpuriesakal
Summary

गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात नाचत असताना एका कलाकाराचा मृत्यू झालाय.

गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) कार्यक्रमात नाचत असताना एका कलाकाराचा मृत्यू झालाय. या घटनेच्या वेळी शेकडो लोक तिथं उपस्थित होते. यावेळी हनुमानाची (Hanuman) वेशभूषा परिधान केलेला कलाकार अचानक स्टेजवर कोसळला. लोकांना वाटलं की, तो अभिनय करतोय. काही वेळ त्याच्या अंगात कोणतीही हालचाल जाणवली नाही. मग, लोकांनी जवळ जाऊन त्याला पाहिलं. त्यानंतर लोकांनी घाईघाईनं बेशुद्ध झालेल्या कलाकाराला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

ही घटना उत्तर प्रदेशातील मैनपुरीची (Uttar Pradesh Mainpuri) आहे. गणेशोत्सवानिमित्त देशभरात ठिकठिकाणी, तसेच इथंही गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलीय. मैनपुरी कोतवाली परिसरातील बंशीगौरामधील शिवमंदिरातही (Shiv Temple) गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून याठिकाणी दररोज पूजेसह भजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.

Uttar Pradesh Mainpuri
Tribal Girls : राजस्थानच्या आदिवासी मुलींची महाराष्ट्र, गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी

भजनात भाविक झाले होते 'तल्लीन'

शनिवारी सायंकाळीही इथं भजन मंडळाला बोलावून भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भजन मंडळासोबत रवी शर्मा नावाचा एक कलाकारही होता, जो भगवान हनुमानाच्या वेशभूषेत भजनावर नाचत होता. नाचत असताना कलाकार रवी शर्मा अचानक स्टेजवर कोसळला. भजनात तल्लीन झालेल्या भक्तांना प्रथम रवि शर्मा अभिनय करत असल्याचं जाणवलं. लोक टाळ्या वाजवत राहिले आणि भजनाचा कार्यक्रमही चालू राहिला.

Uttar Pradesh Mainpuri
लैंगिक शोषण प्रकरण : शिवमूर्ती मुरुगा स्वामींच्या जामीन अर्जावरील सुनावणी कोर्टानं पुढं ढकलली

भाविकांनी रवीला उठवण्याचा प्रयत्न केला

थोड्या वेळानंतर रवीच्या अंगात कोणतीही हालचाल जाणवली नाही. मग, भाविकांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पण, तो जागचा उठलाच नाही. रवी शर्माला बेशुद्ध अवस्थेत तातडीनं मैनपुरी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आता या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये रवी शर्मा डान्स करताना अचानक स्टेजवर कोसळताना दिसतोय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com