

Tirupati Devastanam Scam
esakal
Devastanam Scam Tirupati : तिरुमला तिरुपती देवस्थानमध्ये ५४ कोटी रुपयांचा शाल गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. साधारणपणे २०१५ ते २०२५ या काळात हा गैरव्यवहार झाल्याचे अंतर्गत चौकशीतून स्पष्ट झाले आहे. संबंधित कंत्राटदाराने रेशीम शाल असल्याचे भासवून शंभर टक्के पॉलिस्टरपासून तयार करण्यात आलेल्या शालींचा पुरवठा केल्याचे दिसून येते. देवस्थानचे अध्यक्ष बी. आर. नायडू यांनी याबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर या प्रकाराची चौकशी सुरू झाली होती. मंदिरामध्ये धार्मिक विधीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला भेट म्हणून ही शाल देण्यात येते.