राष्ट्रपतींनी केली व्यंकटेश्‍वराची पूजा

वृत्तसंस्था
रविवार, 3 सप्टेंबर 2017

तिरुपती: येथून जवळच असलेल्या तिरुमला येथील श्री व्यंकटेश्‍वराच्या मंदिरात जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज पूजा केली. राष्ट्रपती कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता व अन्य कुटुंबीय तीन मंदिरांना भेटी देण्यासाठी कालच येथे आले होते.

राष्ट्रपतिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची ही पहिलीच भेट होती. ते मंदिरात अर्धा तास होते, असे मंदिर सूत्रांनी सांगितले. या वेळी त्यांच्याबरोबर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि राज्यपाल इ.एस.एल. नरसिंहन होते.

राष्ट्रपतींचे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आगमन होताच येथील पुजाऱ्यांनी मंत्रघोषात त्यांचे स्वागत केले. दोन हजार वर्षे जुने हे मंदिर आहे. प्रार्थना झाल्यानंतर मंदिराच्या पुजाऱ्यांनी राष्ट्रपतींना आशीर्वाद दिले. मंदिराचे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार यांनी त्यांना सिल्कचे वस्त्र आणि प्रसाद दिला. त्यानंतर राष्ट्रपती दिल्लीला रवाना झाले. राष्ट्रपतींनी काल तिरुचनूर येथील देवी पद्मावती मंदिरालाही भेट दिली होती.

Web Title: tirupati news President worshiped Vyankateshwara