
तिरुमला तिरुपती देवस्थाननं त्यांच्या एका पदाधिकाऱ्याला निलंबित केलंय. हा पदाधिकारी चर्चमध्ये प्रार्थनेला जात असल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. तसंच पदाधिकाऱ्यावर असाही आरोप आहे की, तो ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्याचं काम करत होता. याआधीही तिरुमला तिरुपती देवस्थानने जवळपास १८ कर्मचाऱ्यांना अशाच कारणांमुळे निलंबित केलंय.