Tirupati Trust Fake Ghee Case: खळबळजनक! 'तिरुपती ट्रस्ट'ला बनावट डेअरीतून पुरवलं गेलं तब्बल २५० कोटींचं ‘भेसळयुक्त तूप’

CBI SIT Investigation about Tirupati Trust Fake Ghee : सीबीआय एसआयटीने तूप भेसळीच्या चौकशीदरम्यान हा धक्कादायक खुलासा केला.
CBI SIT officials investigating the ₹250 crore adulterated ghee scam linked to Tirupati Trust’s temple offerings.

CBI SIT officials investigating the ₹250 crore adulterated ghee scam linked to Tirupati Trust’s temple offerings.

esakal

Updated on

Fake Ghee Supply to Tirupati Temple Trust : तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादात वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या कथित भेसळीची सीबीआय चौकशी करत आहे. तपास पथकाने या प्रकरणात आता एक धक्कादायक खुलासा केला आहे. उत्तराखंडमधील एका डेअरीकडून तिरुपती देवस्थानमला (टीटीडी) तब्बल ६८ लाख किलो बनावट तूप पुरवल्याचे सीबीआयला आढळून आले आहे.

विशेष म्हणजे या डेअरीने कधीही दूध किंवा बटर खरेदी केलेले नाही. याप्रकरणी नेल्लोर न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अहवालानुसार, २०१९ ते २०२४ दरम्यान, भोले बाबा ऑरगॅनिक डेअरीने टीटीडीला जवळपास २५० कोटी रुपयांचे तूप पुरवले होते.

अटक केलेल्या पुरवठादार अजय कुमार सुगंध याची चौकशी केल्यानंतर तपासात हे यश मिळाले आहे. ज्याने डेअरीला मोनोडायग्लिसराइड्स आणि एसिटिक अॅसिड एस्टर सारखी रसायने पुरवली. अहवालात, तपासकर्त्यांनी असे म्हटले आहे की डेअरीने कधीही दूध किंवा बटरचा एक थेंबही खरेदी केला नाही, तरीही मोठ्या प्रमाणात तूप उत्पादन दाखवण्यासाठी बनावट खरेदी आणि देयक रेकॉर्ड तयार केले.

CBI SIT officials investigating the ₹250 crore adulterated ghee scam linked to Tirupati Trust’s temple offerings.
Dharmendra Superhit Dialogues : धर्मेंद्रचे सुपरहीट डायलॉग, जे आजही करोडो चाहत्यांच्या मनावर करताय राज!

टीटीडीने भोले बाबा ऑरगॅनिक डेअरीला २०२२ मध्ये काळ्या यादीत टाकले होते. मात्र त्याचे प्रमोटर्स  इतर मार्गांनी बनावट तूप पुरवत राहिले. सीबीआयने म्हटले आहे की त्यांनी तिरुपती येथील वैष्णवी डेअरी, उत्तर प्रदेशातील माल गंगा आणि तामिळनाडूमधील एआर डेअरी फूड्ससह इतर अनेक डेअरींद्वारे पुरवठा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com