'आधार'विरोधातील लढा सुरूच राहणार - तृणमूल कॉंग्रेस

पीटीआय
मंगळवार, 9 जानेवारी 2018

संसदेतील प्रश्‍नोत्तराच्या तासात उपस्थित केलेले प्रश्‍न आणि ममता बॅनर्जी यांच्या जाहीर घोषणांमधून तृणमूल कॉंग्रेसने आधारकार्डसंबंधीच्या समस्यांना उघड केल्या आहेत. आम्ही थांबणार नाही. "आधार'विरोधातील लढा तृणमूल संसदेत आणि संसदेबाहेर सुरूच ठेवेल

नवी दिल्ली - आधारकार्डशी संबंधित समस्या शोधण्याची आणि केंद्र सरकारच्या आधारकार्डसंबंधित निर्णयाच्या विरोधासाठी तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) ठाम आहे. यासाठी संसदेत आणि बाहेर मोहीम सुरूच आहे,'' पक्षाचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी सांगितले.

आधारकार्ड सक्तीविरोधात पक्षाची भूमिका ठाम असल्याचे ओब्रायन यांनी एका निवेदनाद्वारे सांगितले. ते म्हणाले, ""संसदेतील प्रश्‍नोत्तराच्या तासात उपस्थित केलेले प्रश्‍न आणि ममता बॅनर्जी यांच्या जाहीर घोषणांमधून तृणमूल कॉंग्रेसने आधारकार्डसंबंधीच्या समस्यांना उघड केल्या आहेत. आम्ही थांबणार नाही. "आधार'विरोधातील लढा तृणमूल संसदेत आणि संसदेबाहेर सुरूच ठेवेल.''

आधार मोबाईल फोनच्या क्रमांकाला लिंक करण्यास पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा विरोध आहे. ""आपला फोन बंद झाला तरी चालेल, पण आधारशी तो कदापि जोडणार नाही,'' असा इशारा त्यांनी या पूर्वी दिला आहे. "याबाबत केंद्र सरकार हुकूमशाही लादू पाहत आहे, अशी टीका करीत भाजपला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी "तृणमूल'ला पुढाकार घ्यावा लागेल, असेही पक्षातर्फे सांगण्यात आले होते.

संसदचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी "तृणमूल'ची बैठक झाली. त्यात आधार कार्डच्या प्रश्‍नावर सरकारला कोंडीत पकडण्याचा आदेश बॅनर्जी यांनी दिला होता.

Web Title: tmc adhar card india mamata banerjee