

कोलकता : तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि ममता बॅनर्जी यांच्यात तुलना केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. वेगळा पक्ष स्थापन करत पक्षीय, संसदीय राजकारणात ममता बॅनर्जी यांना यश मिळाले आणि ही बाब नेताजींनाही जमली नाही, असा दावा घोष यांनी केला. १९३९ मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती.