

West Bengal political twist
esakal
NCPI MP Jagdish Basunia Claims: पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींना वेग आला असून तृणमूल काँग्रेसमधून नुकतेच 'नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया'मध्ये दाखल झालेले खासदार जगदीश चंद्र बर्मा बसुनिया यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. आगामी दुर्गापूजेपूर्वी एनसीपीआयच्या २० पैकी १७ खासदार हे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. मात्र, यामध्ये तीन अल्पसंख्याक खासदारांचा समावेश नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.