पनीरसेल्वम यांना आणखी 3 खासदारांचा पाठिंबा

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडत असलेले ओ. पनीरसेल्वम यांनी शशिकला नटराजन यांच्यासमोर आपले आव्हान मजबूत करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. पनीरसेल्वम यांना अण्णा द्रमुकच्या लोकसभेतील 8 आणि राज्यसभेतील 2 खासदारांनी पाठिंबा दिला आहे.

चेन्नई - ओ. पनीरसेल्वम यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची आणखी बळकट केली असून, आज (रविवार) त्यांना आणखी 3 खासदारांनी पाठिंबा दिला आहे. 

मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडत असलेले ओ. पनीरसेल्वम यांनी शशिकला नटराजन यांच्यासमोर आपले आव्हान मजबूत करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. पनीरसेल्वम यांना अण्णा द्रमुकच्या लोकसभेतील 8 आणि राज्यसभेतील 2 खासदारांनी पाठिंबा दिला आहे. पनीरसेल्वम यांना यापूर्वीच 9 आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे अण्णा द्रमुकचे 134 आमदार असलेल्या विधानसभेत पनीरसेल्वम यांची स्थिती हळूहळू मजबूत होत आहे.

तुतीकोरीन येथील खासदार जयसिंह थियागराज नॅटर्जी, वेल्लोर येथील सेनगुट्टावन आणि पेरांबलुर येथील आर. पी. मारुथाराजा यांनी आज पनीरसेल्वम यांना पाठिंबा दिला. तमिळनाडूमध्ये पनीरसेल्वम आणि जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला नटराजन यांच्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. अद्याप राज्यपालांकडून कोणालाही सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करण्यात आलेले नाही.

Web Title: TN crisis: Setbacks continue for Sasikala camp as 10 MPs join OPS