रोखे बाजाराचा आरसा काय सांगतो?

रोखे बाजारात ४० वर्षांपूर्वी मोठ्या ३० उद्योग समुहांच्या मालकीच्या नोंदणीकृत कंपन्यांचे एकत्रित मूल्य ६२०० कोटी रुपये इतके होते.
Securities Market
Securities MarketSakal

रोखे बाजारात (Securities Market) ४० वर्षांपूर्वी मोठ्या ३० उद्योग समुहांच्या मालकीच्या नोंदणीकृत कंपन्यांचे एकत्रित मूल्य ६२०० कोटी रुपये इतके होते. त्यावेळी एकूण देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) (GDP) २८ पटींनी जास्त होते. ते एक लाख ७५ कोटी रुपये इतके होते. बहुतांश कंपन्या प्राथमिक उत्पादन क्षेत्रांत होत्या. ताग, चहा, सिमेंट, साखर, पोलाद बांधणी, वस्त्रोद्योग असे त्यांचे उत्पादन होते. त्यानंतर नाट्यमय बदल होत आहेत. राष्ट्रीय शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे एकत्रित मूल्य जीडीपीच्या सुमारे १५ पटींनी जास्त आहेत, जे गेल्या वर्षी १९७ ट्रीलीयन इतके होते. (TN Ninan Writes about Securities Market)

विचित्र बाब अशी की मक्तेदारी निर्माण केलेल्या बड्या उद्योग समुहांची ताकद तेव्हा राजकीय वादाचा ज्वलंत मुद्दा ठरली होती. आजच्या दृष्टिकोनातून ही ताकद अत्यंत कमी आहे. आज अशा कंपन्यांच्या माध्यमातून जमविलेल्या संपत्तीचा आनंद साजरा केला जातो. याचे कारण शेअर बाजार आणि सामाईक निधीच्या (म्युच्युअल फंड) माध्यमातून आणखी अनेक किरकोळ गुंतवणूकदार विकत घेतले जातात. उद्योग जगतातील प्रसार माध्यमांच्या आवाजाला जास्त वजन प्राप्त झाले आहेत. अग्रगण्य उद्योगपतींच्या राजकारणावरील नियंत्रणाबाबतची चर्चा भडक पद्धतीने होत नाही.

भांडवलशाहीचे कायदेशीर स्वरूप संथ टप्प्यांतून पूर्ण आहे आहे. यामध्ये अग्रगण्य उद्योगपती आणि सरकारी अधिकारी यांच्यातील परस्परपूरक भांडवलशाहीचाही समावेश आहे. सरकारी भांडवलशाहीकडे प्रारंभी पाठ करण्यात आली होती.

Securities Market
कर्नाटकात आणखी शिथिलता येणार; Unlock - 3 संदर्भात उद्या बैठक

राष्ट्रीयकरणाचा याआधीचा मोठा टप्पा १९८०च्या दशकाच्या प्रारंभी पार पडला. बँका, मुंबईतील कापड गिरण्या आणि तत्कालीन कलकत्त्यामधील अभियांत्रिकी केंद्रांचा समावेश होता. या प्रक्रियेचे झालेले परिणाम खराब होते. १९८० आणि १९९०ची दशके म्हणजे उद्योग क्षेत्रांतील वादाला अंत नसलेला कालावधी होता, पण अंबानी आणि त्यानंतर अदानी यातून सहीसलामत बाहेर पडले.

दरम्यानच्या काळात सुधारणा झाल्या. परवाना राज संपुष्टात आले. खासगी उद्योग आणि परदेशी गुंतवणुकीसाठी नवी क्षेत्रे खुली करण्यात आली. त्यातून खासगी क्षेत्र ढवळून निघाले. जे बदलांचा यशस्वी सामना करू शकले नाहीत ते एक तर नामशेष झाले किंवा त्यांचे महत्त्व नगण्य बनले. यात मफतलाल, खेतान, थापर, मोदी आणि साराभाई अशा उद्योगसमूहांचा समावेश होता. त्यांची जागा नव्या ताऱ्यांनी घेतले, जे वित्त, तंत्रज्ञान सेवा, औषध उत्पादन, वाहन निर्मिती अशा क्षेत्रांतील होते. आजघडीला रोखे बाजारात या प्रवाहाचे चित्र प्रतिबिंबित झाले आहे.

निफ्टी ५० सुचीतील ५० पैकी ११ रोखे वित्तसेवा, सहा कंपन्या वाहननिर्मिती, पाच आयटी सेवा, चार औषधनिर्मिती आणि सात उर्जेशी संबंधित सार्वजनिक क्षेत्रातील आहेत.

वाहननिर्मिती सोडल्यास उप्तादनाचे प्रतिनिधित्व अत्यंत असमाधानकारक आहे. याच निफ्टीमध्ये विविध कंपन्यांचा समावेश असलेल्या काही उद्योगसमूहांचे स्थान कायम आहे. निफ्टीमध्ये टाटाच्या चार, बिर्लाच्या दोन, अंबानी आणि अदानी यांच्या प्रत्येकी एका कंपनीला स्थान आहे. १९८१ मधील जगाच्या तुलनेत ही दुनिया वेगळी आहे.

Securities Market
तीरथ सिंह रावतच मुख्यमंत्रीपदी; राजीनाम्याबाबत वाच्यता नाही!

निफ्टी ५० मध्ये जसे बदलाचे प्रतिबिंब उमटते, तसेच ज्याची उणीव आहे ती सुद्धा उघड होते. एकीकडे कमी खर्चाची उत्पादने आणि दुसरीकडे दर्जेदार अन्् सखोल मूल्य असलेल्या कंपन्या दिसत नाहीत. यासाठी काही प्रमुख देशांची उदाहरण देता येतील. निफ्टी ५० च्या धर्तीवर ही चर्चा करूयात. जर्मनीच्या डॅक्स३० मधील बीएएसएफ, डॅमलर, सिमेन्स किंवा फ्रान्सच्या सीएसी ४० मधील एअरबस, श्नायडर, थेल्स यांच्यासह चैनीच्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या एलव्हीएमएच, हर्मीज अशा कंपन्या निफ्टी ५० मध्ये नाहीत. आणखी एक अभाव आहे आणि तो म्हणजे उच्चतम विकासाचे तंत्रज्ञान अवलंबत जगाचे पुनरुत्थान केलेल्या आणि अमेरिकेतील नॅस्डॅकमध्ये वर्चस्व राखलेल्या कंपन्याही येथे नाहीत.

ब्रिटन हा आता उत्पादन क्षेत्रातील सत्ता राहिलेला नाही, पण त्यांच्या एफटीएसइ १०० मध्ये त्या देशाने वित्त, ग्राहकोपयोगी ब्रँड आणि रिटेलिंग अशा क्षेत्रांत केलेले स्थित्यंतर दिसून येते. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जम बसविलेल्या ऊर्जा आणि औषधनिर्मिती कंपन्याही तेथे आघाडीवर आहेत.

अमेरिकेनंतरची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून जपानचा उल्लेख केला जातो. त्यांच्या निक्केई २२५ चे स्वरूप इतके व्यापक आहे की त्यात जवळपास प्रत्येक क्षेत्राचे मिश्रण दिसते.

Securities Market
गुडन्यूज! आता गर्भवती महिलानांही घेता येईल कोरोनाची लस

चीनने आपल्या परीने चढाई सुरु केली आहे. इंटरनेटवर आधारित तसेच उच्चतम वेगाच्या रेल्वे कंपन्यांच्या जोरावर चीन ग्राहकांना अतिरिक्त मूल्य आणि त्यानुरूप सेवा देण्यात आघाडी घेत आहे. शांघाय कॉम्पोझीटमध्ये वित्त, बांधकाम, औषध उत्पादन, वाहननिर्मिती यांचा वाटा उचित असून त्यांच्या जोडीला फॉक्सकॉनसारख्या कंत्राटी उत्पादक कंपनीचाही समावेश आहे. रोखे बाजाराचे निर्देशांक बदलत्या वस्तुस्थितीचा आरसा असतात. त्याच्या पलीकडील पूर्ण चित्र ते दाखवीत नाहीत याचे कारण नोंदणी नसलेल्या आणि बहुतांश वेळा ह्युंदाई, कोका-कोला अशा परदेशी मालकीच्या कंपन्यांची कामगिरी त्यात गणली जात नाही.

बिझनेस स्टँडर्डची यादी

बिझनेस स्टँडर्डने सर्वांत मोठ्या एक हजार नोंदणीकृत कंपन्यांची यादी तयार केली आहे. त्यासाठी रोखे बाजारातील मुल्य नव्हे तर विक्रीचा निकष लावण्यात आला. मोठ्या कंपन्यांमध्ये स्थावर माल, कापड, वस्त्र, तंत्रज्ञान सॉफ्टवेअर अशा क्षेत्रांचा यात समावेश आहे. वस्त्र-कापड क्षेत्रातील अरविंद ही सर्वांत मोठी कंपनी १४८व्या क्रमांकावर असून त्यांच्या विक्रीचा आकडा ७३६० हजार कोटी रुपये इतका मर्यादित आहे. तंत्रज्ञानाशी संबंधित हार्डवेअर हे क्षेत्र मात्र यात नाही. नावीन्याचा अंगीकार केलेल्या बहुतांश नव्या कंपन्या सुद्धा तंत्रज्ञानावर आधारित सेवा देणाऱ्याच आहेत.

- टी. एन. नैनन (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

(अनुवाद : मुकुंद पोतदार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com