
डोलो-650 ची विक्री वाढविण्यासाठी डॉक्टरांना दिले एक हजार कोटी; CBDT चा आरोप
नवी दिल्ली - कोरोनाच्या कालावधीत ताप कमी करण्यासाठी सर्वांच्या तोडांत डोलो-650 या गोळ्यांचं नाव होतं. ही गोळी सर्वांनाच ठावूक झाली होती.आता ही ब्रँड बनवणाऱ्या कंपनीबाबत मोठा खुलासा झाला आहे. काही दिवसांपूर्वीच डोलो 650 निर्माती कंपनीवर धाड पडली होती. (Dolo 650 news in marathi)
हेही वाचा: शिंदे सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने डोलो-650 औषध निर्मात्यावर डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिकांना डोलो-650ची विक्री वाढविण्याच्या मोबदल्यात सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या मोफत भेटवस्तू दिल्याचा आरोप केला आहे. 6 जुलै रोजी नऊ राज्यांमधील बेंगळुरूस्थित मायक्रो लॅब्स लिमिटेडच्या 36 ठिकाणी छापे टाकल्यानंतर आयकर विभागाने हा दावा केला आहे.
हेही वाचा: ‘ईडी’च्या धास्तीनेच राजकीय उलथापालथ! दोन मंत्री तुरुंगात, राहुल गांधीही सुटले नसल्याची भीती
एका निवेदनात, सीबीडीटीने सांगितले की, औषध निर्मात्यावर कारवाई केल्यानंतर विभागाने 1.20 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि 1.40 कोटी रुपयांचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त केले आहेत. या संदर्भात मायक्रो लॅबला पाठवलेल्या ई-मेलला कंपनीने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. सीबीडीटीने म्हटले की, शोध मोहिमेदरम्यान, कागदपत्रे आणि डिजिटल डेटाच्या स्वरूपात महत्त्वपूर्ण पुरावे सापडले असून ते जप्त करण्यात आले आहेत.
Web Title: To Increase The Sale Of Dolo 650 Tablets Doctors Got Gifts Worth 1000 Crores
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..