
देवाला भेटायच्या इच्छेसाठी एका महिलेनं इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलीय. हैदराबादच्या हिमायतनगर इथं घडलेल्या घटनेमुळं खळबळ उडालीय. महिलेचं नाव पूजा जैन असं आहे. गेल्या काही दिवसांपासून ती अध्यात्माकडे वळली होती आणि धार्मिक कर्मकांड करत होती. पती अरुण कुमार जैन हे ऑफिसला गेले असताना पत्नीनं टोकाचं पाऊल उचललं.