
गेल्या पाच दशकांपासून हजारो गरीब रुग्णांवर केवळ दोन रुपयांमध्ये उपचार करणारे डॉक्टर एके रायरू गोपाल यांचं निधन झालं. वयाच्या ८०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयोमानानुसार काही आजारांचा त्यांना त्रास होता. डॉक्टर गोपाल त्यांच्या दवाखान्यात फक्त दोन रुपयांमध्ये गरीब रुग्णांवर उपचार करायचे. यामुळे दोन रुपयेवाले डॉक्टर अशी त्यांची ओळख होती.