कावेरी मसुद्याचा आज निर्णय 

पीटीआय
शुक्रवार, 18 मे 2018

कावेरी पाणी वाटपासंदर्भातील कावेरी व्यवस्थापन योजनेसाठी मसुदा तयार करण्याच्या अंतिम टप्प्यास स्थगिती न देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राखून ठेवला. 

नवी दिल्ली - कावेरी पाणी वाटपासंदर्भातील कावेरी व्यवस्थापन योजनेसाठी मसुदा तयार करण्याच्या अंतिम टप्प्यास स्थगिती न देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राखून ठेवला. 

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे, की कावेरी पाण्याच्या लाभार्थी राज्यांच्या सूचना न्यायालय विचारात घेईल. ""आम्ही या संबंधीचा आदेश शुक्रवारी (ता. 19) देऊ. जर ते शक्‍य झाले नाही तर 22 किंवा 23 मे रोजी निर्णय दिला जाईल,'' असे खंडपीठाने सांगितले. कर्नाटकमध्ये नवे सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने मसुद्याला अंतिम रूप देण्यास तूर्त स्थगिती द्यावी, अशी विनंती याचिका कर्नाटकने ज्येष्ठ वकील श्‍याम दिवाण यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात केली होती; पण बुधवारी (ता.16) न्यायालयाने त्यास नकार दिला होता. 

Web Title: Today decision of the Kaveri draft