नरेंद्र मोदींचे आज सिडनी डायलॉगमध्ये मुख्य भाषण; 'या' विषयावर करणार चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi

नरेंद्र मोदींचे आज सिडनी डायलॉगमध्ये मुख्य भाषण; 'या' विषयावर करणार चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सिडनी डायलॉगमध्ये भारताचा 'तंत्रज्ञान विकास आणि क्रांती' या विषयावर मुख्य भाषण देतील. सिडनी डायलॉग 17 ते 19 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूटचा हा उपक्रम आहे.

पंतप्रधान कार्यालयाने (PMO) एका निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान 18 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता 'सिडनी डायलॉग' मध्ये मुख्य भाषण देतील. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणापूर्वी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन उद्घाटनपर भाषण करणार आहेत.

मोदींनी ट्विट केले की, "गुरूवारी सकाळी ९ वाजता सिडनी संवादाला संबोधित करतील. हे प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाच्या नवीन मार्गांवर आणि पृथ्वीच्या सुधारणेसाठी त्यांचा कसा उपयोग करता येईल यावर लक्ष केंद्रित करतो.

हेही वाचा: उद्योगांनी जोखीम पत्करावी, क्षमता वाढीसाठी गुंतवणूक करावी: सीतारामन

'सिडनी डायलॉग'चा मुख्य उद्देश राजकारणी, सरकारी प्रमुखांसह उद्योग जगतातील नेत्यांकडून व्यापक चर्चा आणि नवीन कल्पनांचे सादरीकरण हा आहे. त्याच वेळी, हा संवाद प्रत्येकाला एकाच व्यासपीठावर आणेल आणि तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या संधी आणि आव्हानांची समज विकसित करण्यासाठी कार्य करेल. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे हे देखील या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत.

loading image
go to top