भारत रशिया यांच्यात आजपासून युद्धसराव 

पीटीआय
सोमवार, 10 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्या हवाई दलांचा संयुक्त युद्ध अभ्यास उद्यापासून (ता. 10) जोधपूरमध्ये सुरू होत आहे. या युद्ध अभ्यासाचा उद्देश दोन्ही सैन्यांमध्ये कारवाईच्या वेळेस समन्वय असावा हा आहे. या युद्ध अभ्यासाला अविंद्रा असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये रशिया आपले कोणतेही साहित्य आणणार नसून, ते भारतीय प्लॅटफॉर्मचाच वापर करणार आहेत, असे भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी 2014 मध्ये प्रथम दोन्ही देशांनी संयुक्तपणे युद्ध अभ्यास केला होता. 

भारतीय हवाई दलातील अनेक फायटर जेट विमाने ही मूळची रशियाचीच आहेत. त्याचप्रमाणे दोन्ही वायुदलांनी यापूर्वी आंतरसंचलनाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. या युद्ध अभ्यासात रशियन फेडरेशन एरोस्पेस फोर्स हे भारतीय हवाई दलाबरोबर एकाचवेळेस उड्डाण करणार आहेत, असे संरक्षण मंत्रालयाने आपल्या पत्रकात स्पष्ट केले आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये रशिया भारताचा मोठा भागीदार असून, दोन्ही देशांमधील सहकार्य नियमितपणे वाढत आहे. गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये भारत आणि रशिया यांच्यात दहा दिवसांचा संयुक्तिकपणे युद्ध अभ्यास केला होता. 

Web Title: From today to the war practice between India and Russia