आता टोलनाकेही होणार भगवे

वृत्तसंस्था
रविवार, 17 जून 2018

उत्तरप्रदेशात आता टोलनाक्यांनाही भगवा रंग देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकार आल्यापासून रंग बदलण्याची मोठी मोहिम सुरू झाली आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचा रंग बदलण्यात आलेला आहे. तसेच, काही सरकारी इमारतींसोबतच, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा आणि खुर्चीचाही रंग बदलण्यात आला होता. यामध्ये सरकारी शाळांचाही समावेश होता. आता यामध्ये टोलनाक्यांचाही समावेश होणार आहे.

मुझफ्फरनगर(उत्तरप्रदेश) - उत्तरप्रदेशात आता टोलनाक्यांनाही भगवा रंग देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकार आल्यापासून रंग बदलण्याची मोठी मोहिम सुरू झाली आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचा रंग बदलण्यात आलेला आहे. तसेच, काही सरकारी इमारतींसोबतच, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा आणि खुर्चीचाही रंग बदलण्यात आला होता. यामध्ये सरकारी शाळांचाही समावेश होता. आता यामध्ये टोलनाक्यांचाही समावेश होणार आहे.

मुजफ्फरनगर-सहारनपूर या मार्गावरील टोलनाक्याला भगवा रंग देण्यात आला असून संपूर्ण टोलनाका भगव्या रंगाने रंगवला आहे. भगवा रंग देणं हे पूर्वीच ठरलं होतं, हा त्याच्या डिझाइनचाच एक भाग होता असं टोलनाक्याच्या व्यवस्थापकांनी यावेळी सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात जवळपास सर्वच सरकारी कार्यालयांना भगवा रंग देण्याचा विषय हा सध्या चर्चेचा विषय बनत आहे. तर विरोधी पक्ष मात्र यावर टीका करताना दिसत आहेत.

Web Title: Toll plaza on Muzaffarnagar Saharanpur highway painted saffron in colour