esakal | गर्दीने सरकार चिंतेत, राज्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटनस्थळांवरील गर्दीला आवरा, केंद्राच्या राज्यांना सूचना

पर्यटनस्थळांवरील गर्दीला आवरा, केंद्राच्या राज्यांना सूचना

sakal_logo
By
नामदेव कुंभार

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाटच अद्याप ओसरलेली नाही, त्यामुळे विविध पर्यटनस्थळांवर होणाऱ्या गर्दीला आवर घालावा लागेल. ही गर्दी आवरली नाही तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते ही बाब लक्षात घेऊन विविध राज्यांनी उत्साही पर्यटकांना वेळीच आवरावे, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे. गृहसचिव अजय भल्ला यांनी आज कोरोना संसर्गाची स्थिती आणि लसीकरण याचा आढावा घेण्यासाठी विविध राज्यांच्या मुख्य आणि गृहसचिवांबरोबर उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत भल्ला यांनी हिमाचल प्रदेश व काही राज्यांमध्ये पर्यटन स्थळांवर अतिरिक्त गर्दी होऊ लागली असून काही उत्साही पर्यटकांकडून नियमांचे पालन न होणे ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. प्रसारमाध्यमांतील काही बातम्यांचा दाखला देतानाच त्यांनी ही गर्दी त्वरित आटोक्यात आणली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असा इशारा दिला.

हेही वाचा: प्रीतम मुंडेंना डावलल्याने नाराजीचा स्फोट; भाजपमध्ये राजीनामासत्र

काळजी घ्यायलाच हवी

राज्यांनी रुग्णांचा शोध घेत चाचण्या वाढवाव्यात तसेच बाधितांवर देखील उपचार करावेत. कोरोनाची दुसरी लाट दुसरी लाट अजून संपलेली नाही. तेव्हा लसीकरणालाही वेग दिला पाहिजे असे त्यांनी सांगितले.दरम्यान गृह सचिवांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत राष्ट्रीय लसीकरण मोहिमेचादेखील आढावा घेण्यात आला. विशेषतः महाराष्ट्र, गोवा, हिमाचल प्रदेश, केरळ, राजस्थान, तमिळनाडू, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढीचा दर अजूनही दहा टक्क्यांच्या पुढे असल्याच्या वृत्ताबाबत त्यांनी विशेष काळजी घेण्याची सूचना संबंधित राज्य सरकारांना केली. गृहसचिवांनी यावेळी विविध राज्यांना लसीकरण वाढविण्याच्याही सूचना केल्या.आगामी काळात केंद्र सरकारकडून राज्यांना लशींचा मोफत पुरवठा वाढविण्यात येईल, त्यामुळे राज्यांनी आपली मागणी अगोदर नोंदवावी असे त्यांनी सांगितले.

loading image