पर्यटन मास्टर आराखडा व धोरण लवकरच; गोवा पर्यटनमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

गोव्याचा पर्यटन मास्टर आराखडा व पर्यटन धोरण लवकरच पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन आज पर्यटनमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर यांनी आज विधानसभेतील प्रश्नोत्तर तासाच्या उत्तरावेळी दिले.

गोवा : देश - विदेशीतील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उच्च दर्जाच्या सोयी देण्याची गरज आहे हे लक्षात ठेवूनच गोव्याचा पर्यटन मास्टर आराखडा व पर्यटन धोरण लवकरच पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन आज पर्यटनमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर यांनी आज विधानसभेतील प्रश्नोत्तर तासाच्या उत्तरावेळी दिले.

आराखडा व धोरण तयार करताना सरकार विविध भू क्षेत्र, सीआरझेड अधिसूचना या सर्व बाबींचा विचार करण्यात येईल व तो पूर्ण झाल्यावर त्याचे सादरीकरण सर्व आमदारांना केले जाईल. हे सर्व पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून सहाय्य मिळण्याची गरज आहे. काँग्रेसचे सभागृहातील विरोधी आमदार फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांनी प्रश्न विचारला होता.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Tourism Master Plan and Policy Soon says Goa Tourism Minister