बिहार- रहस्यमयी मृत्यूला 'लिची' कारणीभूत?

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

बिहार - मुजफ्फरपुरमध्ये 2014 मध्ये रोगाची साथ पसरुन 122 मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हे रहस्यमयी मत्यूचे सत्र सुरुच आहे. मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे होत आहे समजू शकले नव्हते . स्थानिक लोक या रोगाला 'चमकी' म्हणतात एवढीच या रोगाबद्दल माहिती उपलब्ध होती. आता मात्र या प्रकरणाने एक वेगळेच वळण घेतले आहे. या रहस्यमयी मृत्यूला 'लिची' हे फळ कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.

मुजफ्फरपुरमध्ये लिचीचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. या भागातून लिचीची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. 

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी संयुक्तपणे यावर एक संशोधन केले असुन, यातून हा निष्कर्ष समोर आला आहे. गरिब वस्ती असलेल्या या भागात मुलांना खायला सकस आहार मिळत नाही. ही मुले लिची खाऊन जगतात. रिकाम्या पोटी लिची खाल्ल्याने त्यांना हा रोग होतो असे संशोधनात म्हटले आहे. 

कुपोषित असल्याने मुलांची रोगप्रतिकारक देखील शक्ती कमी असते. उपाशीपोटी लिची फळ खाल्ल्याने शरिरात उर्जेची निर्मिती करणा-या फॅटी ऍसिड आणि ग्लूकोजचे ऑक्सिडिकरण होते असे डॉक्टरांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे उपाशी पोटी लिची न खाण्याचा तसेच तिचे अतिसेवन करु नये असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Web Title: Toxins in litchi kill children in Bihar