Tractor Parade : काय घडले राजधानीत?

Tractor Rally
Tractor Rally

गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्याच्या विरोधात राजधानी दिल्ली आणि सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मंगळवारी हिंसक वळण लागले. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा नियोजित मार्ग बदलत ट्रॅक्टर रॅली राजधानीत घुसली. संतप्त शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर फडकवलेला शिखांचा झेंडा पोलिसांनी उतरवला. पोलिस आणि आंदोलकांशी चर्चा झाल्यानंतर आंदोलकांनी लाल किल्ला परिसर सोडले.   

२६ जानेवारी २०२१

  • सकाळी ७ : गाझीपूर, सिंघू आणि टिकरी सीमेवर शेतकरी गोळा
  • ८ .०० : ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात 
  • ८.५० : टिकरी सीमेवर शेतकऱ्यांकडून बॅरिकेड्‌स बाजूला करण्यास सुरुवात
  • ११.०० : मार्ग सोडून संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगर येथे जमलेल्या शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर. 
  • ११.३० : शेतकरी पोलिसांच्या वाहनांवर चढले
  • दुपारी १२.१५ : गाझीपूर सीमेवरील शेतकरी प्रगती मैदानात, आयटीओच्या दिशेने गेले
  • १२.३० : पोलिसांच्या वाहनांची, दिल्ली परिवहनच्या गाड्यांची तोडफोड
  • १२.४८ : गाझीपूर सीमेजवळ चिंतामणी चौकात पोलिसांकडून लाठीचार्ज, शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या साह्याने बॅरिकेड्‌स मोडले
  • १२.५५ : आयटीओ परिसरात शेतकऱ्यांना हटविण्यासाठी अश्रुधुराचा वापर
  • १.१० : टिकरीहून येणाऱ्या मोर्चाला अडविण्यासाठी पोलिसांनी बनविलेली मानवी साखळी शेतकऱ्यांनी मोडली
  • १.१५ : दिल्ली मेट्रोकडून अनेक स्थानके बंद
  • १.३० : शेतकरी लाल किल्ल्याजवळ जमले
  • २.०० : शेतकरी मोठ्या संख्येने लाल किल्ल्यात घुसले, झेंडे फडकविले
  • ३.०० : आंदोलकाने लाल किल्ल्याच्या घुमटावर निशाण साहिब फडकविले. 
  • ३.३० : दिल्लीतील काही भागांतील इंटरनेट सेवा बंद
  • ३.४० : लाठी चार्ज करून लाल किल्ल्याच्या परिसरातून शेतकऱ्यांना हटविले. 
  • ४.०० : ट्रॅक्टर उलटल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू . 
  • ५.१५ : हिंसाचाराशी संबंध नसल्याचा संयुक्त किसान मोर्चाचा दावा 
  • ६.१० : गृहमंत्री अमित शहांकडून परिस्थितीचा आढावा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चौकशीच्या मागणीसाठी याचिका
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चावेळी झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी करणाऱ्या दोन याचिका आज सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. तसेच, कोणत्याही पुराव्याशिवाय शेतकऱ्यांना ‘दहशतवादी’ असे जाहीर न करण्याची सूचना माध्यमांना द्यावी, अशी विनंतीही याचिकेद्वारे करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रारही याचिकेत केली आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com