ट्रॅक्टर ट्रॉली कॅनॉलमध्ये पलटी होऊन 14 महिलांचा मृत्यू

वृत्तसंस्था
रविवार, 24 जून 2018

ट्रॅक्टर ट्रॉली मुसी नदीवरील कॅनॉलच्या रस्त्याने महिला आणि मुलांना घेऊन जात होता. त्यादरम्यान तेलंगणातील वेमुलाकोंडा गावाजवळ ही दुर्घटना घडली. ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

हैदराबाद : तेलंगणामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली कॅनॉलमध्ये पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 14 महिलांचा मृत्यू झाला असून, एक बालक दगावले. या अपघातानंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला असून, पोलिस फरारी ट्रॅक्टरचालकाचा शोध घेत आहेत.

ट्रॅक्टर ट्रॉली मुसी नदीवरील कॅनॉलच्या रस्त्याने महिला आणि मुलांना घेऊन जात होता. त्यादरम्यान तेलंगणातील वेमुलाकोंडा गावाजवळ ही दुर्घटना घडली. ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या भीषण अपघातात 14 महिला आणि एका बालकाचा मृत्यू झाला. याशिवाय अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ट्रॅक्टरचालक या अपघातातून बचावला असून, तो अद्याप फरारी आहे. पोलिसांकडून त्याला शोधण्यासाठी तपास सुरु करण्यात आला आहे.

Web Title: Tractor trolley Accident 14 Women died