निर्यात घटल्याने व्यापारी तुटीत लक्षणीय वाढ

वाणिज्य मंत्रालयाची माहिती : जागतिक मागणीतील मंदीचा परिणाम
trade exports decline imports rise
trade exports decline imports rise

नवी दिल्ली : ऑक्टोबरमध्ये देशाच्या निर्यातीत झालेली घट आणि आयातीत झालेली वाढ यामुळे व्यापारी तूट २६.९१ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. सप्टेंबरमध्ये ही तूट २५.७१ अब्ज डॉलर होती. वाणिज्य मंत्रालयाने आज ही आकडेवारी जारी केली. सुमारे दोन वर्षांच्या अंतरानंतर निर्यातीने नकारात्मक क्षेत्रात प्रवेश केला असून, मुख्यत: जागतिक मागणीतील मंदीमुळे, व्यापारी तूट वाढल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

ऑक्टोबर २०२१च्या तुलनेत या ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १६.६५ टक्क्यांनी घट झाली असून, ती २९.७८अब्ज डॉलर झाली आहे. ऑक्टोबर २०२१मध्ये ३५.७३ अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. ऑक्टोबरमध्ये आयात वाढून ५६.६९ अब्ज डॉलरवर गेली आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये ती ५३.६४ अब्ज डॉलर होती. यामुळे व्यापारी तूट वाढली आहे.

देशाची व्यापारी मालाची निर्यात सप्टेंबरमधील ३५.४५ अब्ज डॉलरवरून घसरून ऑक्टोबरमध्ये २९.७८अब्ज डॉलर झाली आहे. एप्रिल-ऑक्टोबर २०२२ या सहामाही दरम्यान, निर्यातीत १२.५५ टक्क्यांनी वाढ होऊन ती २६३.३५ अब्ज डॉलर झाली. तर आयात ३३.१२ टक्क्यांनी वाढून ४३६.८१ अब्ज डॉलर झाली आहे.

अलिकडच्या काही महिन्यांत कमोडिटीजच्या किंमतीत वाढ झाल्याने आणि देशाची अर्थव्यवस्था सुधारत असल्याने मागणी वाढत आहे, त्यामुळे आयातही वाढली आहे. मात्र जागतिक अर्थव्यवस्था मंदावल्याने निर्यात घटली आहे. रत्ने आणि दागिने, अभियांत्रिकी, पेट्रोलियम उत्पादने, सर्व कापड, रसायने, फार्मा, सागरी उत्पादने व चामड्याचे तयार कपडे या निर्यात क्षेत्रांनी ऑक्टोबरमध्ये नकारात्मक वाढ नोंदवली. तर तेलबिया, तेल जेवण, इलेक्ट्रॉनिक वस्तू, तंबाखू, चहा आणि तांदूळ यांचा समावेश असलेल्या क्षेत्रांमध्ये सकारात्मक वाढ नोंदवली गेली.

कच्च्या तेलाच्या आणि कापूस, खते आणि यंत्रसामग्री यासारख्या काही कच्च्या मालाची आवक वाढल्याने आयात वाढली आहे. तेलाची आयात २९.१ टक्क्यांनी वाढून १५.८ अब्ज डॉलरची झाली आहे. सोन्याची आयात मात्र या महिन्यात २७.४७ टक्क्यांनी घसरून ३.७ अब्ज डॉलरवर आली आहे.

अमेरिका आणि युरोपमधील कठोर आर्थिक धोरणाचा जागतिक स्तरावरील मागणीवर परिणाम होत असून, जागतिक अस्थिर वातावरणाने मागणी घटत आहे, याचा परिणाम भारताच्या निर्यातीवरही होत आहे.

ऑक्टोबरमध्ये नकारात्मक वाढ नोंदवणारी निर्यात क्षेत्रे (आकडेवारी टक्क्यांमध्ये)

  • २१.५६ - रत्ने आणि दागिने

  • २१.२६ - अभियांत्रिकी

  • ११.२८ - पेट्रोलियम उत्पादने

  • २१.१६ - तयार कपडे

  • १६.४४ - रसायने

  • ९.२४ - फार्मा

  • १०.८३ - सागरी उत्पादने

  • ५.८४ - चामड्याच्या वस्तू ( लेदर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com