वाहतूक नियम मोडल्यास चार हजारांचा दंड - केजरीवाल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

बस भाड्याने घेणार
नवी दिल्ली : राजधानीत येत्या चार नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सम-विषम रस्ता वाहतूक योजनेसाठी दिल्ली सरकारने दिल्ली परिवहन महामंडळाला (डीटीसी) दोन हजार सीएनजी बस भाड्याने घेण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी दोन हजार जादा बस भाड्याने घेण्याच्या निर्णयास मान्यता देण्यात आली.

नवी दिल्ली - दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी लागू करण्यात येणाऱ्या ‘सम-विषम’ योजनेतून गणेशातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज जाहीर केले. नियमाचे पालन न करणाऱ्यांकडून ४ हजाराचा दंड वसूल केला जाईल, असेही त्यांनी संगितले.

राजधानीत ४ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत अमलात येणाऱ्या या योजनेबाबत केजरीवाल यांनी अंतिम घोषणा केली. या योजनेतून महिला, दिव्यांग तसेच दुचाकीचालकांना वगळण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांना ‘सम-विषम’मधून सूट दिली असली तरी विद्यार्थ्यांना शाळेत सोडून रिकाम्या परतणाऱ्या गाडीचालकांबाबत काय?, असा प्रश्‍न विचारला असता ‘शाळांमध्ये मुलांना सोडण्याची वेळ साधारण सकाळी सात ते आठ अशी असते. यामुळे या योजनेच्या काळात चालकाने आठपूर्वी घरी परतणे आवश्‍यक आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. वाहनांच्या क्रमांकातील शेवटचा अंक सम आहे की विषम यावरून ती गाडी सम किंवा विषम तारखेला रस्त्यावर येणे अपेक्षित आहे.

यांना मिळणार सूट
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, सरन्यायाधीश,  लोकसभा व राज्यसभेचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, राज्यसभेतील आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते, दिल्ली सोडून अन्य राज्यांचे मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, उपराज्यपाल,  आप्तकालीन वाहने, तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठीची वाहने, पोलिस, संरक्षण खात्याची क्रमांक असणारी वाहने.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनीही ‘सम-विषम’ योजनेचे पालन करणे अनिवार्य आहे. मात्र दिल्लीच्या नायब राज्यपालांना यातून वगळण्यात आले आहे.
- केजरीवाल, मुख्यमंत्री दिल्ली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic rules break 4000 rupees fine in delhi arvind kejriwal