राजस्थानमधील जयपूर येथे पेट्रोल पंपाजवळ एलपीजी गॅस टॅंकर ने वाहनांना जोरदार धडक दिली यानंतर लागलेल्या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 40 पेक्षा जास्त वाहने आणि एक कारखाना जळून खाक झाला आहे. घटनेने संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्फोटाचा आवाज 10 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला, त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये घबराट पसरली.