दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावणार 180 किमी वेगाने रेल्वे

वृत्तसंस्था
सोमवार, 3 डिसेंबर 2018

स्वदेशी बनावटीची ही रेल्वेगाडी पुढील महिन्यापासून कार्यरत होण्याचा अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेत कार्यरत होईल, त्या वेळी ती भारतातील सर्वांत वेगवान रेल्वे गाडी असेल, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता दिल्ली ते वाराणसी अशी ही रेल्वे धावणार असल्याचे निश्चित आहे. यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचा मुहूर्त शोधण्यात आला आहे.

नवी दिल्ली : भारतातील पहिली इंजिनविरहित रेल्वेगाडी टी-18ची चाचणी रविवारी यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता ही रेल्वे 25 डिसेंबरपासून दिल्ली ते वाराणसीदरम्यान धावणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  

रविवारी चाचणीदरम्यान 180 किमी प्रतितास वेगाचा टप्पा या रेल्वेने गाठला होता. कोटा ते सवाई माधोपूर या स्थानकांदरम्यान रेल्वे विभागाने ही चाचणी घेतली. या चाचणीदरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. लोहमार्ग आणि सिग्नल यंत्रणा यात सुधारणा केल्यास ही रेल्वे तासाला दोनशे किमीचा वेगही गाठू शकते. 

स्वदेशी बनावटीची ही रेल्वेगाडी पुढील महिन्यापासून कार्यरत होण्याचा अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेत कार्यरत होईल, त्या वेळी ती भारतातील सर्वांत वेगवान रेल्वे गाडी असेल, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता दिल्ली ते वाराणसी अशी ही रेल्वे धावणार असल्याचे निश्चित आहे. यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचा मुहूर्त शोधण्यात आला आहे.

वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाजपेयी यांचा वाढदिवस आणि ख्रिसमसच्या निमित्ताने ही रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. नव्या पिढीचा रेल्वे म्हणून या दिवसापासून रेल्वे सुरु करण्याचा विचार आहे. 

Web Title: Train 18 Likely To Launch On 25 december Between Delhi To Varanasi