युवकांच्या प्रसंगावधानाने टळली रेल्वे दुर्घटना

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

हे दोघे जण फोनवर बोलण्यासाठी रेल्वे रुळाजवळ आल्यानंतर त्यांना प्रणतिक ते बोलपूर रेल्वे स्थानकादरम्यान रूळ तुटल्याचे लक्षात आले. ज्या वेळी त्यांना येथून पॅसेंजर जाणार असल्याचे कळले, तेव्हा तातडीने त्यांनी आपल्या घरून लाल रंगाचा एक टॉवेल आणला आणि चालकाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी रेल्वे रुळावर जाऊन तो फडकविण्यास सुरवात केली.

शांतिनिकेतन - रेल्वे रूळ तुटल्याचे लक्षात येताच दोन युवकांनी चालकाला रेल्वे थांबविण्यास सांगितल्याने आज वीर भूम जिल्ह्यात मोठी दुर्घटना टळली. हे दोघे जण फोनवर बोलण्यासाठी रेल्वे रुळाजवळ आल्यानंतर त्यांना प्रणतिक ते बोलपूर रेल्वे स्थानकादरम्यान रूळ तुटल्याचे लक्षात आले. ज्या वेळी त्यांना येथून पॅसेंजर जाणार असल्याचे कळले, तेव्हा तातडीने त्यांनी आपल्या घरून लाल रंगाचा एक टॉवेल आणला आणि चालकाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी रेल्वे रुळावर जाऊन तो फडकविण्यास सुरवात केली. त्यानंतर चालकाने तातडीने गाडी थांबविली; मात्र दोन बोगिंनी तत्पूर्वीच हे तुटलेले रूळ ओलांडले होते.

रेल्वेची मोठी दुर्घटना टाळल्याबद्दल पूर्व विभागाच्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या दोन तरुणांचे कौतुक केले. त्यानंतर तासाभरात हे रूळ दुरुस्त करण्यात आले.

Web Title: train accident avoided