बिहारमध्ये रेल्वेच्या धडकेत 6 महिलांचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

धुक्यामुळे रेल्वे आल्याची समजू शकल्याने महिलांना धडक बसली. स्वातंत्र्य सेनानी एक्स्प्रेसच्या धडकेत सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर काही महिला जखमी झाल्या असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरंभगा - बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील रामभद्रपूर येथे छटपूजेचा कार्यक्रम करून परतत असताना रेल्वेची धडक बसून सहा महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छटपूजा करून घरी परतत असताना आज (सोमवार) पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे रुळ ओलांडत असताना धुक्यामुळे रेल्वे आल्याची समजू शकल्याने महिलांना धडक बसली. स्वातंत्र्य सेनानी एक्स्प्रेसच्या धडकेत सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर काही महिला जखमी झाल्या असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुसरीकडे मुझफ्फरपूर येथे छट पूजेदरम्यान बोट बुडाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत पाच मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. 

Web Title: train accident in bihar six women died