रेल्वेला उशिर झाल्यास रेल्वे अधिकाऱ्यांवर होणार 'ही' कारवाई

वृत्तसंस्था
रविवार, 3 जून 2018

मागील आठवड्यात रेल्वेमंत्री गोयल आणि रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत रेल्वेगाड्या उशिराने धावण्याच्या मुद्द्यावरून गोयल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.

नवी दिल्ली : रेल्वेगाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने सुटणे, असे प्रकार अनेकदा अनुभवायला मिळतात. मात्र, यावर रेल्वे प्रशासनाने कडक पावले उचचली आहेत. यापुढे रेल्वेगाड्यांना उशिर झाल्यास संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांची बढती रोखण्यात येईल, असा इशारा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सर्व विभागीय प्रमुखांना दिला आहे.  

मागील आठवड्यात रेल्वेमंत्री गोयल आणि रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत रेल्वेगाड्या उशिराने धावण्याच्या मुद्द्यावरून गोयल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. तसेच गोयल यांनी रेल्वेचे वेळापत्रक कोलमडण्याची कोणतीही कारणे देऊ नका. गाड्या जर वेळेवर धावणार नसतील तर त्याची किंमत मोजावी लागेल. याशिवाय रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रमोशन रोखण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

रेल्वेच्या अधिकाऱ्यांना कामकाजात सुधारणा आणण्यासाठी महिनाभराचा कालावधी देण्यात येईल. येत्या 30 जूनपर्यंत सुधारणा दिसली नाहीतर संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना बढती मिळणार नाही. तसेच कामकाजाच्या मूल्यांकनावेळीही याबाबतचा विचार केला जाईल, असेही गोयल यांनी सांगितले.

Web Title: Train delays to cost officials their promotions says piyush goyal