रेल्वे तिकीट परीक्षकाने तोडले वरिष्ठाचे नाक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

भोपाळ- एका रेल्वे तिकीट परीक्षकाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱयाचे नाक चावा घेऊन तोडल्याची घटना कत्नी रेल्वे स्टेशनवर गुरुवारी (ता. 23) सायंकाळी घडली.

रेल्वे स्टेशनच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, तिकीट परीक्षक मनोज शर्मा यांची येथील रेल्वे स्टेशनवर नियुक्ती आहे. त्यांची कामाची वेळ संपल्यानंतर ते कार्यालयात गेले होते. कार्यालयात यावेळी वरिष्ठ अधिकारी नरेंद्र कुमार मीना होते. कामावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. शर्मा यांनी नरेंद्र कुमार यांच्यावर हल्ला करून चावा घेऊन नाक तोडून काढले.

नरेंद्र कुमार यांचा चेहरा रक्ताबंबाळ झाल्याचे पाहून अन्य सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शर्माला अटक करण्यात आली असून, याबाबत चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.

Web Title: Train ticket examiner bites his senior's nose