मराठा इन्फट्रीतून प्रशिक्षणार्थी जवान बेपत्ता

अमृत वेताळ
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरमधून ( एमएलआय आरसी) प्रशिक्षनार्थी जवान बेपत्ता झाला आहे.  या संबंधी शुक्रवारी (ता. 17) कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

बेळगाव: मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरमधून ( एमएलआय आरसी) प्रशिक्षनार्थी जवान बेपत्ता झाला आहे.  या संबंधी शुक्रवारी (ता. 17) कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

करीमउल्ला मेहबूबबाशा शेख (वय 19, रा. पमळपाडू आंध्रप्रदेश असे बेपत्ता झालेल्या जवानाचे नाव आहे. मंगळवार (ता. 14) रोजी पहाटे 4.50 च्या सुमारास कोणालाही न सांगता सेंटरमधुन निघून गेला आहे, अशी माहिती तेथिल अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

तो अद्याप परतलाच नाही त्यामुळे या प्रकरणी मेजर राधेश्याम (वय 32) यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तपास चालविला आहे. बेपत्ता करीउल्ला याची उंची176 सेंमी असून त्याने अंगावर खाकी रंगाचे कपडे परिधान केलेले आहेत. तसेच, त्याला हिंदी, तमिळ, तेलगू भाषा अवगत आहेत. वरील वर्णनातील व्यक्तीबद्दल कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी कॅम्प पोलीस स्थानकाशी सम्पर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी यावेळी केले आहे.

Web Title: Trainee trainee soldier missing from Maratha Infantry