निपाह संसर्गचा संशय असलेल्या केरळच्या रुग्णावर गोव्यात उपचार 

विलास महाडिक
सोमवार, 28 मे 2018

प्रथमदर्शनी या तरुणाला निपाह संसर्ग झाल्याचे चिन्हे दिसत नसली तरी संशय नको म्हणून त्याचे रक्ताचे नमुने पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट वायरोलॉजी या केंद्राकडे पाठविण्यात आले आहेत.

पणजी (गोवा) - गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आलेल्या केरळ येथील वीस वर्षीय तरुणावर निपाह संसर्गचा रुग्ण असल्याच्या संशयावरून उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्याच्या रक्ताचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार केरळ येथील वीस वर्षीय तरण केरळ येथून उत्तप्रदेशमध्ये रेल्वेने प्रवास करत होता. त्याला ताप आल्याने व अस्वस्थ वाटू लागल्याने सकाळी रेल्वे थिवी येथील रेल्वे स्थानकावर पोहचली असता म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. तरुण केरळचा असल्याने त्याला गोमेकॉ इस्पितळात हलविण्यात आले. प्रथमदर्शनी या तरुणाला निपाह संसर्ग झाल्याचे चिन्हे दिसत नसली तरी संशय नको म्हणून त्याचे रक्ताचे नमुने पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट वायरोलॉजी या केंद्राकडे पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांचा अहवाल 48 तासात मिळाल्यावर पुढील उपचाराची दिशा ठरविली जाईल अशी माहिती गोमेकॉ इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक शिवानंद बांदेकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Treatment in goa on Kerala patients are suspected of being infected with nepha