
मध्य प्रदेशात एक ओव्हरब्रिज चक्क काटकोनात बांधल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणी संबंधित ७ ते १० अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. दरम्यान, बिहारमध्ये एक धक्कादायक असा प्रकार समोर आलाय. १०० कोटी खर्चून रस्ता बांधण्यात आला. पण त्या रस्त्यात मधे असलेली झाडं मात्र कापलेली नाहीत. हा रस्ता बिहारमधील जहनाबाद इथं आहे. राजधानी पटनापासून ५० किमी अंतरावर हा रस्ता आहे.