Viral: थेट 'हनुमाना'लाच रेल्वे पोलिसांची नोटीस, 'दहा दिवसांत जर...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral News

Viral: थेट 'हनुमाना'लाच रेल्वे पोलिसांची नोटीस, 'दहा दिवसांत जर...'

Viral news: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका बातमीनं लक्ष वेधून घेतलं आहे. ती बातमी अशी की आता चक्क भगवान हनुमान यांनाच रेल्वे पोलिसांनी नोटीस धाडली आहे. आणि असं सांगितलं आहे की, येत्या दहा दिवसांत जर ते मंदिर त्या जागेवरुन हटवलं नाही तर मग कारवाईला सामोरं जावं लागेल. झारखंड रेल्वे पोलिसांनी पाठवलेल्या या नोटीशीला नेटकऱ्यांकडून तीव्र विरोध होताना दिसत आहे. आता चक्क देवालाही प्रशासन नोटीसा पाठवू लागले की काय असा प्रश्न त्यांनी केला आहे.

झारखंडमधील धनबाद शहरात हनुमानाचे एक मंदिर आहे. प्रशासनाचे असे म्हणणे आहे की, या मंदिरामुळे वाहतूकीस त्रास होतो तसे ते अतिक्रमणामध्ये हे मंदिर येत असल्यानं अनेक अडचणी आहेत. तेव्हा तातडीनं हे मंदिर ज्या जागेवर आहे तिथून दुसरीकडे स्थलांतरीत करण्यात यावे अशी नोटीस थेट हनुमानालाच पाठविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. मंदिर स्थलांतरीत करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. मंदिर हटवल्यानंतर ती जागा रेल्वे प्रशासनाला देता येईल. असे सांगण्यात आले आहे.

Lord hanuman

Lord hanuman

ही नोटीस त्या मंदिरावर चिटकवण्यात आली आहे. हे मंदिर बऱ्याच वर्षांपासून त्या जागी आहे. असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनानं मंदिर स्थलांतरीत करण्यापेक्षा आणखी काही मार्ग निघतो का याचा विचार करावा. शेवटी गावकऱ्यांच्या भावना आहे. त्यांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे ते मंदिर हटवणे योग्य असेल का असा प्रश्न आहे. प्रशासनानं थेट हनुमान यांच्या नावानं मसुदा लिहिला आहे. त्यात म्हटलं आहे की, आपण रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. आणि हा कायदेशीर गुन्हा आहे.

हेही वाचा: Urvashi Rautela: 'माझा चंद्र नाराज तर नाही ना! कुणी ऐकेना...'

तेव्हा दहा दिवसांत आपण ही जागा खाली करावी. अन्यथा तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. आपण आम्ही पाठवलेल्या नोटीशीचा गांभीर्यानं विचार करावा. ही अत्यावश्यक सेवेचा भाग असणारी नोटीस आहे. मात्र रेल्वे प्रशासनाच्या या नोटीशीचा स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे.

हेही वाचा: Bigg Boss 16: 'तुझे अंतर्वस्त्र....' काय बोलून गेला शालिन?