Bigg Boss 16: 'तुझे अंतर्वस्त्र....' काय बोलून गेला शालिन? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss 16

Bigg Boss 16: 'तुझे अंतर्वस्त्र....' काय बोलून गेला शालिन?

Bigg Boss 16: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या बिग बॉसच्या 16 व्या सीझनला सुरुवात झाली आहे. या शोचा टीआरपी हा त्याच्यात सहभागी झालेले स्पर्धक आणि त्यांच्यातील वाद, भांडण यावर अवलंबून असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. ती भांडणं एवढी टोकाची होतात की, त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन तर होतेच शिवाय त्या शो ची लोकप्रियताही वाढते. म्हणून तर या रियॅलिटी शो चा 16 वा सीझन आता प्रेक्षकांसमोर तितक्याच उत्साहानं सादर होतो आहे.

नव्या सीझनमध्ये सहभागी झालेले स्पर्धक भलतेच आक्रमक असल्याचे त्यांच्या वागण्याबोलण्यावरुन दिसून येत आहे. सह स्पर्धकाशी बोलताना अनेकदा त्यांचे भान सुटते आणि ते काहीही बोलून जातात असे घडत आहे. आता शालीन भनोट आणि सौंदर्या शर्मा यांच्यातील वाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात शालीननं सौंदर्याला उद्देशन जे वक्तव्य केले ते काही नेटकऱ्यांना आवडलेलं नाही. त्यामुळे त्यांनी शालीनला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. शालीननं सौंदर्याच्या अंतर्वस्त्रावर दिलेली प्रतिक्रिया बाकीच्या स्पर्धकांसाठी धक्कादायक ठरली आहे.

हेही वाचा: Vivek Agnihotri: 'मुर्ख आमिर'! जाहिरातीवरुन विवेक अग्निहोत्रींचा संताप

शालीनच्या त्या वागण्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना त्याचं असे हे बोलणे खटकले आहे. बिग बॉसच्या घरात असे दाखवण्यात आले आहे की, शालीन आणि टीना बोलत आहेत. तेवढ्यात तिथे सौंदर्या येते. सौंदर्याला पाहिल्यावर शालीन टीनाला म्हणतो, आता माझ्या डोक्यात एक जोक आला आहे. तो जोक सौंदर्यांच्या अंतर्वस्त्रावरुन होता. त्यावर सौंदर्या त्या जोकला दाद देते. मात्र नंतर त्याविषयी गौतम विगकडे त्याबाबत तक्रार करते.

हेही वाचा: Viral Video: झुकेगा नहीं साला.. 'पुष्पा' स्टाइलवर थिरकले न्यूयॉर्कचे महापौर

तू कोणत्या ब्रँडचे अंतर्वस्त्र परिधान करते अशा आशयाचा तो जोक होता. त्यांच्या या गोष्टी ऐकून सहभागी स्पर्धकांनी शालीनवर नाराजी व्यक्त केली आहे. शालीननं अशा प्रकारे बोलायला नको होते. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

हेही वाचा: Sextortion : पुण्यात मुलीकडून नग्न Video Viral करण्याची धमकी; मुलाची आत्महत्या