Urvashi Rautela: 'माझा चंद्र नाराज तर नाही ना! कुणी ऐकेना...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urvashi Rautela

Urvashi Rautela: 'माझा चंद्र नाराज तर नाही ना! कुणी ऐकेना...'

Urvashi Rautela Share New Post: प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या पोस्ट शेयर करणं काही थांबण्याचे नाव घेत नाही. आपल्या मनात भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्याविषयी किती प्रेम आहे हे तिनं शेयर केलेल्या पोस्टमधून दाखवून दिले आहे. आताही तिनं व्हायरल केलेल्या एका पोस्टमध्ये आपलं कुणी ऐकतचं नाही, कुणीही मदत करायला तयार होत नाही. अशा प्रकारची भावना व्यक्त केली आहे. उर्वशी खास करवा चौथच्या निमित्तानं ऑस्ट्रेलियाला गेली असून तिनं हे व्रत ऋषभसाठी ठेवल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.

आता आपल्यावर कुणी नाराज आहे का, एवढा मोठा प्रवास करुन आपण ज्याच्यासाठी आलो आहोत तो काही ऐकतचं नाही....अशा भावना उर्वशीनं तिच्या त्या पोस्टमधून शेयर केल्या असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. खासकरुन उर्वशीची ती कविता चाहत्यांच्या चर्चेचा विषय असल्याचे दिसून आले आहे. त्यानं मला विचारावं की माझे दु:ख काय आहे, मला कोणती चिंता भेडसावत आहे, मला कशाचा त्रास होतो आहे असे प्रश्न उर्वशीनं त्या कवितेतून विचारले आहेत.

* का चर्चेत आहे उर्वशी रौतेला.....

गेल्या काही दिवसांपासून उर्वशी ही सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. असं म्हटलं जातं की, तिचं आणि भारतीय क्रिकेट संघातील यष्टिरक्षक ऋषभ पंत यांचे खास नाते आहे. भलेही दे दोन्ही सेलिब्रेटी सोशल मीडियावर एकमेकांवर टीका करत असले तरी त्यांच्यातील प्रेम अतुट असल्याचे नेटकऱ्यांचे आणि चाहत्यांचे म्हणणे आहे. भारतीय संघ टी 20 साठी ऑस्ट्रेलियाला गेला आहे. त्याच वेळी उर्वशी देखील ऑस्ट्रेलियाला गेल्यानं चाहत्यांमध्ये वेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा: Bigg Boss 16: 'तुझे अंतर्वस्त्र....' काय बोलून गेला शालिन?

अशातच उर्वशीच्या वेगवेगळ्या पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या व्हायरल झालेल्या त्या पोस्टमध्ये तिचा काव्यात्मक अंदाज दिसून येतो. तिनं एका कवितेच्या माध्यमातून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. ज्या चाहत्यांना खूप आवडल्या आहेत. हिंदीतील ती कविता उर्वशीच्या मनातील सारं काही सांगून जाते असे चाहत्यांनी म्हटले आहे. मात्र यासगळ्यात उर्वशीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी मीम्स तयार करुन तिच्यावर टीकाही केली आहे.

हेही वाचा: Bigg Boss 16: 'अगं सोड त्याला गुदमरेल तो!' टीनाची अब्दुवर बळजबरी