Terrorist Organization : RSS चे नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; 30 जणांची नावं केली जाहीर

जानेवारीमध्ये सरकारनं यूएपीए अंतर्गत टीआरएफला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलंय.
Terrorist Organization RSS leaders
Terrorist Organization RSS leadersesakal

‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनेनं (Terrorist Organization) जम्मू-कश्मीरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 'ग्रुपनं 30 आरएसएस नेते आणि कार्यकर्त्यांची यादी जारी केली आहे. द रेझिस्टन्स फ्रंट ग्रुपनं दावा केलाय, की ते जम्मू आणि कश्मीरमध्ये RSS कार्यकर्त्यांचे रक्त सांडतील.' जानेवारीमध्ये सरकारनं यूएपीए अंतर्गत टीआरएफला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलंय.

Terrorist Organization RSS leaders
China vs India : चीनच्या कुरापती वाढल्या; अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावं बदलली

TRF नं जाहीर केली 30 जणांची नावं

  • संगीता आनंद (जम्मू)

  • करुणा छेत्री (जम्मू)

  • मोहम्मद हारून (जम्मू)

  • इर्शाद तंत्रे (कुलगाम)

  • मंजूर अहमद (कुलगाम)

  • शब्बीर अहमद भट (दक्षिण काश्मीर)

  • मुश्ताक मलिक (अनंतनाग)

  • मोहम्मद मुझांबल (उदमपूर)

  • गौहर दार (दक्षिण काश्मीर)

  • वसीम हयात (जम्मू)

  • मोहम्मद इक्बाल शेख (पुलवामा)

  • अफरोजा बानो (बारामुल्ला)

  • शमीमा बानो (जम्मू)

  • मोहम्मद आझम (राजौरी)

  • जाफर हुसेन गुजर (कुलगाम)

  • मेहराजुद्दीन भट्ट (शोपियन)

  • मुश्ताक बुरजन (शोपियन)

  • सुमैरा बानू (बारामुल्ला)

  • जमरुदा अख्तर (बारामुल्ला)

  • मुबीना अली (बारामुल्ला)

  • रुबिना बेगम (बारामुल्ला)

  • शकीना बेगम (बारामुल्ला)

  • अख्तर जेहरा (बारामुल्ला)

  • स्नॉबर निसार (जम्मू)

  • शबनम अख्तर (काश्मीर)

  • उल्फत गासे (जम्मू)

  • वहिदा (बारामुल्ला)

  • सुनीता वजीर (जम्मू)

  • झारिया अख्तर

  • आफिदा (काश्मीर)

Terrorist Organization RSS leaders
COVID-19 : देशात पुन्हा कोरोनाचा कहर; 24 तासांत आढळले 3,038 नवे रुग्ण, 7 जणांचा मृत्यू

TRF चे लष्कर-ए-तौयबा (LeT) शी संबंध आहेत. ही दहशतवादी संघटना प्रामुख्यानं जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय आहे. दरम्यान, 1 एप्रिल रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, स्वातंत्र्याच्या सात दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरही पाकिस्तानचे लोक नाखूष आहेत आणि त्यांना आता वाटतं की भारताची फाळणी ही चूक होती. ‘अखंड भारत’ हे खरं आहे, पण विभाजित हिंदुस्थान हे ‘दुःस्वप्न’ असल्याचंही ते म्हणाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com