तिहेरी तलाकविरोधात लढणाऱ्या इशरतचा भाजपमध्ये प्रवेश

वृत्तसंस्था
सोमवार, 1 जानेवारी 2018

हावडा येथील भाजप कार्यालयात तिने भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर इशरत म्हणाली, की माझे समर्थन करणाऱ्यांचेच मी समर्थन करणार आहे. इशरत ही तिहेरी तलाक प्रकरणात दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांपैकी एक आहे.

नवी दिल्ली - तिहेरी तलाकविरोधात न्यायालयानी लढाई लढणाऱ्या इशरत जहाँ हिने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये तिचे स्वागत करण्यात आले.

हावडा येथील भाजप कार्यालयात तिने भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर इशरत म्हणाली, की माझे समर्थन करणाऱ्यांचेच मी समर्थन करणार आहे. इशरत ही तिहेरी तलाक प्रकरणात दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांपैकी एक आहे.

पश्चिम बंगालमधील भाजपच्या महासचिव सायंतन बसू यांनी सांगितले, की इशरत जहाँ यांच्या सन्मानासाठी राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. इशरतने ऑगस्ट 2016 मध्ये तिहेरी तलाकविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेत तिने म्हटले होते, की दुबईत असलेल्या पतीने फोनवरून तलाक दिला होता. मला चार मुले असून त्यांनी जबरदस्तीने त्यांच्याजवळ ठेवले आहे.

Web Title: triple talaq petitioner ishrat jahan joined bharatiya janata party