'तोंडी तलाक पीडितांना सरकारकडून 6 हजार रुपये'

वृत्तसंस्था
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

तोंडी तलाकविरोधी कायदा मोदी सरकारने मंजूर केला. त्यानंतर तोंडी तलाक देणाऱ्या पतीविरोधात कडक कारवाई केली जात आहे. अशा पीडित महिलांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारकडून 6 हजार रुपये अनुदान देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. 

लखनौ : तोंडी तलाकविरोधी कायदा मोदी सरकारने मंजूर केला. त्यानंतर तोंडी तलाक देणाऱ्या पतीविरोधात कडक कारवाई केली जात आहे. अशा पीडित महिलांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारकडून 6 हजार रुपये अनुदान देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये मागील वर्षभरात तोंडी तलाकची 250 हून अधिक प्रकरणे समोर आली होती. या सर्व प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. आदित्यनाथ म्हणाले, जोपर्यंत अशा महिलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सरकार त्यांना आर्थिक मदत करत राहील. याशिवाय दुसरे लग्न करणाऱ्या हिंदू पतीवरही कारवाई केली जाईल. 

Video : खासदाराने लगावली कार्यकर्त्याच्या कानशिलात

दरम्यान, समाजातील कोणत्याही घटकातील व्यक्तीने स्वतः ला दुःखी समजू नये. या अशा घटकांसाठी सरकार अनेक चांगल्या योजना राबविणार आहे, असेही ते म्हणाले.

आनंदाची बातमी: 'या' कंपनीने केली वाहनांच्या किंमतीत भरघोस कपात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Triple Talaq victim women will get 6 thousand as Subsidy says Yogi Adityanath