त्रिपुरात शरणार्थींच्या शिबिरात आग; १८ घरे जळून खाक| Tripura | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

त्रिपुरात शरणार्थींच्या शिबिरात आग; १८ घरे जळून खाक

घर जळालेल्या एका शरणार्थीने म्हटलं की, घरांपेक्षा कागदपत्रे जळाल्याने मोठं नुकसान झालं आहे.

त्रिपुरात शरणार्थींच्या शिबिरात आग; १८ घरे जळून खाक

उत्तर त्रिपुरामध्ये शरणार्थींच्या शिबिरात शनिवारी मोठी आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे मिजोरम ब्रू इथल्या घरांमध्ये आग लागली. यात तब्बल १८ शरणार्थींच्या झोपड्या जळून खाक झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी इतर ११ झोपड्यांचेसुद्धा मोठे नुकसान झाले आहे. ज्यांनच्या झोपड्यांचे नुकसान झाले आणि जळाल्या त्यांची राहण्याची सोय इतरत्र करण्यात आली आहे.

याबाबत पानी सागरचे एसडीएम रजत पंत यांनी सांगितलं की, स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागली. तहसिलदार सध्या याची चौकशी करत आहेत. त्यांनी अद्याप अहवाल दिलेला नाही. मात्र काही घरे पूर्णपणे जळाली, तर काही घरे आग पसरू नये त्यामुळे तोडावी लागली.

शरणार्थींच्या शिबिरात मिजोरम ब्रूमधील तब्बल २५० कुटुंब राहतात. इथं घरांमध्ये फारसं अंतर नाही. तसंच ही घरे बांबू, लाकूड इत्यादींपासून तयार करण्यात आली आहेत. ही घरे सहज आगीच्या भक्ष्यस्थानी पडू शकतात. सध्या या आगीमुळे फटका बसलेल्या कुटुंबियांच्या पुनर्वसनाचे काम सुरु आहे. आगीमध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही किंवा कोणी जखमीसुद्धा झाले नाही. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे.

हेही वाचा: कंगना रनौतवर गुन्हा दाखल; शीख समुदायाचा अपमान करणं महागात पडणार

झोपडी जळालेल्या एका शरणार्थीने सांगितलं की, आमच्या घऱांसह यात सर्व कागदपत्रेसुद्धा जळाली. आमच्यासाठी घरे जळण्यापेक्षा हे मोठं नुकसान आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच राज्य सरकारने आमचं धान्य बंद केलं होतं. सरकारने आमचे धान्य पुन्हा सुरु करावं आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आम्ही करत आहे.

१९९७ मध्ये मिझोराममधील बहुसंख्यांक मिजोंसह संघर्षानंतर ममित, कोलासिब आणि लुंगलेई जिलह्यातून ब्रू लोक शेजारी राज्य असलेल्या त्रिपुरामध्ये गेले होते. तिथे सात शरणार्थी शिबिरांमध्ये सध्या ते राहत आहेत. २३ वर्षांनंतर गेल्या वर्षी जानेवारीमध्ये केंद्र सरकारने केंद्र आणि दोन्ही राज्यांसह शरणार्थींमध्ये एक करार झाला. यानंतर त्यांच्या पुनर्वसनासाठी ६०० कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली.

loading image
go to top