कंगना रानावतवर गुन्हा दाखल; शीख समुदायाचा अपमान करणं महागात पडणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kangana ranaut
कंगना रनौतवर गुन्हा दाखल; शीख समुदायाचा अपमान करणं महागात पडणार

कंगना रनौतवर गुन्हा दाखल; शीख समुदायाचा अपमान करणं महागात पडणार

sakal_logo
By
सुधीर काकडे

अभिनेत्री कंगना रानावत ही आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असते. मात्र आता तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कंगना रानावतने काही दिवसांपूर्वी शीख समूदायाच्या विरोधात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. नुकताच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या कंगना रनौतने संपुर्ण शीख समुदाय हा खालिस्थानी असल्याच्या वक्तव्यावरून तीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा: सिद्धूंनी आपल्या मुलांना भारत-पाक सीमेवर पाठवावं: गौतम गंभीर

भारताला स्वातंत्र्या १९४७ ला नाही तर २०१४ ला मिळालं असं म्हणून आपल्या अकलेचे तारे तोडणाऱ्या अभिनेत्री कंगना रनाैतच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. कंगना विरुद्ध एका जुन्या इन्स्टाग्राम स्टोरीविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंगनाने संपूर्ण शीख समुदायाचा खलिस्तानी दहशतवादी म्हणून उल्लेख केला होता, तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना आपल्या बुटाखाली डासांसारखे चिरडल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

दरम्यान, कंगना रानौतला नुकतच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. नेहमी वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेची धनी होत असते. काही दिवसांपूर्वी तिने भारताच्या स्वातंत्र्यावरू केलेल्या वक्तव्यामुळे देखील तीला टीकेचा मोठा सामना करावा लागला होता. त्यावेळी अनेकांनी तिचा पद्मश्री परत घेण्याची मागणी केली होती.

loading image
go to top