मुस्लिम मुलीसोबत विवाह केल्याने कुटुंबाला टाकले वाळीत

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

त्रिपुरातील घटना; भाजपकडून टीका

अंबासा: मुस्लिम मुलीसोबत विवाह केलेल्या हिंदू मुलाच्या कुटुंबाला वाळीत टाकण्याची घटना समोर आली आहे. भाकपच्या अमलाखालील एका पंचायतीने हा फतवा काढला असून, त्याबद्दल टीकेची झोड उठली आहे.

त्रिपुरातील घटना; भाजपकडून टीका

अंबासा: मुस्लिम मुलीसोबत विवाह केलेल्या हिंदू मुलाच्या कुटुंबाला वाळीत टाकण्याची घटना समोर आली आहे. भाकपच्या अमलाखालील एका पंचायतीने हा फतवा काढला असून, त्याबद्दल टीकेची झोड उठली आहे.

ढलाई जिल्ह्यातील कमालपूर भागात हा प्रकार घडला. नोआगावमधील सजल दास हा तरुण त्याच्या मुस्लिम पत्नी व मुलांसह बामणचारा गावातील एका नातेवाइकाच्या घरी आला होता. ही बाब पंचायतीच्या उपप्रमुखाला कळाल्यानंतर त्यांनी इतर सदस्यांना याची माहिती देऊन 31 जुलै रोजी पंचायतीची बैठक बोलवली; आणि त्यात आमच्या कुटुंबीयांना वाळीत टाकण्याचा निर्णय घेतला. अशी माहिती संबंधित तरुणाने दिली आहे.
आजच्या युगात जातीबाहेर विवाह, तसेच भेदभाव याला थारा राहिलेला नसताना, तसेच हा ज्याचा त्याच्या इच्छेचा प्रश्न असताना राज्यात सत्तेत असलेले कम्युनिस्टांचे सरकार अशा प्रकारांना खतपाणी घालत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. पंचायतींना व्यक्तींच्या इच्छेत ढवळाढवळ करण्याचा अधिकार नसल्याचेही भाजपने म्हटले आहे.

Web Title: tripura news muslim hindu marriage