काँग्रेसला खिंडार; 12 आमदारांचा राजीनामा?

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 जून 2019

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर पुन्हा एकदा काँग्रेसला जबरदस्त धक्का लागण्याची शक्यता आहे. तेलंगणात काँग्रेसच्या 18 पैकी 12 आमदारांनी  विधानसभेच्या अध्यक्ष पोचराम श्रीनिवास यांची भेट घेतली आहे. “आम्हाला टीआरमध्ये पक्षामध्ये विलीन होण्यास मंजुरी द्यावी”, अशी मागणी या 12 आमदारांनी केली.

हैद्राबाद: लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर पुन्हा एकदा काँग्रेसला जबरदस्त धक्का लागण्याची शक्यता आहे. तेलंगणात काँग्रेसच्या 18 पैकी 12 आमदारांनी  विधानसभेच्या अध्यक्ष पोचराम श्रीनिवास यांची भेट घेतली आहे. “आम्हाला टीआरमध्ये पक्षामध्ये विलीन होण्यास मंजुरी द्यावी”, अशी मागणी या 12 आमदारांनी केली.

तेलंगणातील 119 जागांपैकी 88 जागांवर टीआरएसचे आमदार आहेत. त्या तुलनेत काँग्रेसला केवळ 19 जागांवर विजय मिळाला होता. लोकसभा निवडणुकीत आमदार एन. उत्तम कुमार रेड्डी यांनी नालगोंडाच्या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांनी आमदार पदाचा राजीनामा दिला होता. तेलंगणातून हुजूरनगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. यामुळे काँग्रेसचे तेलंगणात फक्त 18 आमदार शिल्लक राहिले होते. मात्र या आमदारांपैकी 12 आमदारांनी आम्हाला टीआरएसमध्ये सहभागी व्हायचं असल्याची इच्छा बोलून दाखवली आहे. यानुसार आज (6 जून) या 12 आमदारांनी विधानसभेच्या अध्यक्षांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आम्हाला टीआरमध्ये पक्षामध्ये विलीन होण्यास मंजुरी द्यावी अशी मागणी या 12 आमदारांनी केली आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या आमदारांची मागणी विधानसभा अध्यक्षांनी मान्य केल्यास, त्यांचे विधानपरिषदेत केवळ 6 आमदार उरतील. तसेच तेलंगणामध्ये काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही गमवावे लागण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trouble brews for Telangana Congress 12 of 18 MLAs meet Speaker for merger with TRS