तेलंगणमध्ये टीआरएस, काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सकाळी साडेनऊपर्यंत मिळालेल्या कौलानुसार टीआरएस 55 आणि काँग्रेस 33 तर भाजप 4 आघाडीवर जागांवर आहेत. 

हैदराबाद : तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सकाळी साडेनऊपर्यंत मिळालेल्या कौलानुसार टीआरएस 55 आणि काँग्रेस 33 तर भाजप 4 आघाडीवर जागांवर आहेत. 

तेलंगणमध्ये 119 जागांसाठी मतदान झाले होते. तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र समितीसमोर काँग्रेसचे आव्हान होते. अंदाजे तीन कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावला होता. तेलंगणामध्ये आमच्या पक्षाला प्रचंड बहुमत मिळून पुन्हा एकदा सत्तेवर येऊ, असा ठाम विश्‍वास तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी यापूर्वी व्यक्त केला होता. विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी आठ महिने आधीच सभागृह बरखास्त करून निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या तेलंगणमध्ये मात्र 'टीआरएस' पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज आहे. मात्र, काँग्रेस आणि टीडीपी आघाडीकडून त्यांना कडवी लढत मिळत आहे.

तेलंगण (जागा : 119 बहुमतासाठी : 60) 
टीआरएस काँग्रेस भाजप अन्य 
रिपब्लिक टीव्ही-जन की बात 50-65 38-52 4-7 8-14 
टाइम्स नाऊ-सीएनएक्‍स 66 37 7 9 
न्यूज एक्‍स-नेता 57 46 6 10 
टीव्ही9 तेलुगू-आरा 75-85 25-35 2-3 7-11 
इंडिया टुडे-ऍक्‍सिस माय इंडिया 79-91 21-33 1-3 4-7 
टीव्ही5 न्यूज 50-65 38-52 4-7 8-14

Web Title: TRS takes lead in Telangana fight between congress and TRS