निपाणीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत ट्रकचालक ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

रघु व त्याचा सहकारी हे दोघे ट्रक (डीजे- ०६- ५७६६) घेऊन गुजरात हून बंगळूरच्या च्या दिशेने जात होते. जाताना यमगरणी येथील बीडी कॉलनी नजिक ते थांबले होते. आज (ता. ३०) सकाळी रघू हा मुख्य महामार्ग पार करत असताना त्याला अज्ञात वाहनाने ठोकरले.

निपाणी : मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगरणी नजिक अज्ञात वाहनाच्या धडकेत ट्रक चालक जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी (ता. ३०) सकाळी घडली. रघु उर्फ दीपक मोहन भाई (रा. खोलफुलीया परिसर, गोधरा) असे मृत चालकाचे नाव आहे.

याबद्दल माहिती अशी, रघु व त्याचा सहकारी हे दोघे ट्रक (डीजे- ०६- ५७६६) घेऊन गुजरात हून बंगळूरच्या च्या दिशेने जात होते. जाताना यमगरणी येथील बीडी कॉलनी नजिक ते थांबले होते. आज (ता. ३०) सकाळी रघू हा मुख्य महामार्ग पार करत असताना त्याला अज्ञात वाहनाने ठोकरले. त्यात रघूचा मृत्यू झाला.

घटनास्थळी बसवेश्वर चौक पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. पुंज लाईट हायवे पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांनी मदत कार्य केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: truck driver killed in accident near Nipani