Karnataka : शेतकऱ्याला शिव्या देत चोरट्यांचा टोमॅटोवर डल्ला; पाठलाग करून पळवला अडीच टन टोमॅटोचा ट्रक

देशभरात टोमॅटोचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. टोमॅटो वाचवण्यासाठी लोक आता विविध युक्त्या अवलंबत आहेत.
Tomato Truck
Tomato Truckesakal
Summary

शेतकऱ्याकडे पैसे नसल्याने त्याने आरोपींशी बोलणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी ऐकले नाही. त्यानंतर आरोपींनी ट्रक लुटला.

बंगळूर : टोमॅटोचे (Tomato) भाव सध्या गगनाला भिडले आहेत. ते प्रतिकिलो १०० रुपयांपेक्षा अधिक झाल्यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. कर्नाटकची राजधानी बंगळूरजवळ चिक्काजाला (Bangalore Chikkajala) येथे टोमॅटोने भरलेला ट्रकच एका टोळीने पळवून नेल्याची घटना घडली.

रस्त्यावरील वादातून घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशभरात टोमॅटोचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. टोमॅटो वाचवण्यासाठी लोक आता विविध युक्त्या अवलंबत आहेत.

Tomato Truck
Jain Muni Case : जैन मुनींच्या हत्येबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; सिद्धरामय्या म्हणाले, तपास CBI कडं देण्याची..

तथापी, चोर देखील वेगवेगळ्या मार्गाने टोमॅटोची चोरी करत आहेत. दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये टोमॅटोच्या दुकानावर बॉन्सर तैनात करण्यात आले होत. त्याचवेळी, आता बेंगळुरूमध्ये काही चोरट्यांनी टोमॅटोने भरलेला ट्रक लुटला आहे.

मात्र, आठवड्याभरापूर्वी कर्नाटकातूनही अशीच बातमी समोर आली होती. बंगळूरजवळील चिक्काजाला येथे रोड रेजच्या नावाखाली तीन लोकांच्या टोळीने टोमॅटोने भरलेल्या ट्रकचा कथितपणे पाठलाग केला. बराच वेळ पाठलाग करून ट्रक थांबवून तो टोमॅटोने भरलेला ट्रक घेऊन पळून गेले. ट्रकमध्ये सुमारे अडीच टन टोमॅटो भरला होता.

Tomato Truck
Maharashtra Politics Update : मुश्रीफांसारख्या दिग्गजाविरोधात जिद्दीनं लढा; 'या' नेत्याला मिळणार निष्ठेचं फळ, लोकसभेसाठी तीन नावं चर्चेत

बाजारात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असून 100 ते 150 रुपये किलो दराने विकला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुर येथील मल्लेश हा शेतकरी शनिवारी कोलार येथे टोमॅटो घेऊन जात होता. टोमॅटोने भरलेल्या ट्रकने आरोपी ज्या कारमधून जात होते त्या कारला धडक दिली.

यानंतर आरोपींनी शेतकरी व त्याच्या चालकाशी गैरवर्तन केले आणि भरपाईच्या नावाखाली मोठ्या रकमेची मागणी सुरू केली. मात्र, शेतकऱ्याकडे पैसे नसल्याने त्याने आरोपींशी बोलणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी ऐकले नाही. त्यानंतर आरोपींनी ट्रक लुटला.

Tomato Truck
PM Crop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! आता एक रुपयात मिळवा पीक विमा; 'या' तारखेपर्यंत असणार मुदत

शेतकऱ्याने सांगितले की, प्रथम आरोपीने जबरदस्तीने ट्रक चालवण्यास सुरुवात केली आणि नंतर शेतकरी व चालकाला ढकलून दिले आणि तो टोमॅटोने भरलेला ट्रक घेऊन पळून गेला. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार, ट्रकमध्ये सुमारे अडीच टन टोमॅटो होते, ज्याची किंमत अडीच ते तीन लाख रुपये होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com